Posts

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी

Image
  माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं डोंबिवलीच्या एका प्रामाणिक रिक्षाचालकाने. डोंबिवली, दि. 29 जून 2025  रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्टेशन ते शंकेश्वर स्टॅन्ड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका दांपत्याची महत्त्वाची पिशवी रिक्षात विसरली गेली. या पिशवीत रोख रक्कम आणि कपडे असा महत्त्वाचा ऐवज होता. ही पिशवी रिक्षाचालक संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली होती. विशेष म्हणजे, पिशवी हरवली आहे हे लक्षात येताच त्या दांपत्याच्या चेहऱ्यावर काळजी व हतबलता स्पष्ट दिसत होती. महिलेला तर अश्रू अनावर झाले होते. त्यांना वाटले होते की आपली रोख रक्कम व वस्तू परत मिळणे अशक्य आहे. मात्र रिक्षा स्टॅन्डवरील इतर सहकारी रिक्षाचालकांनी त्यांना धीर दिला आणि शक्य तेवढ्या लवकर वस्तू शोधण्यास सुरुवात केली.  आणि जर ती संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली असेल तर ती भेटणारच असा विश्वासही दिला. प्रवाशांनी दिलेल्या रिक्षा व चालकाच्या वर्णनावरून रिक्षाचालकांनी अंदाज बांधला की कदाचित संतोष वरकुटे यांच्या रिक्षातच ती पिशवी राहिली असावी. याच दरम्यान संतोष वरकुटे रिक्षा बंद करण्याच्या तयारीत होत...

एसएनडीटी महिला विद्यापीठाला NAAC कडून A+ मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त

Image
मुंबई, जून 2025: एसएनडीटी महिला विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) कडून प्रतिष्ठेचे A+ श्रेणी मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त झाले आहे, याची विद्यापीठास अभिमानपूर्वक घोषणा करत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, समावेशक शिक्षणपद्धती व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या गतिमान नेतृत्वाखाली विद्यापीठाने अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सातत्याने प्रगती साधली आहे. या यशामागे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, अंतर्गत गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (IQAC) आणि हितधारकांचे अथक परिश्रम व संघभावना आहे. विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीत खालील प्रमुख अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे: कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वात प्र-कुलगुरू प्रा. रूबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, IQAC संचालक प्रा. प्रज्ञा वाकपैंजण तसेच, सर्व अधिष्ठाते, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा व मूल्यांकन संचालक, संचालकगण आणि प्रशासनातील सर्व घटकांनी यासाठी मेहनत घेतली आहे. य...

मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी

Image
मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी भेट  जालना/मुंबई, ३० जून :** मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी रात्री अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सुमारे अर्ध्या तास चाललेल्या या चर्चेत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल विचारविनिमय झाला. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आठवले यांच्याकडे सुपूर्द केले. मंत्री आठवले यांनी हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असून लवकरच फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती दिली. रामदास आठवले यांनी सांगितले की, "मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले, मात्र काही मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण योग्य आहे का, टिकेल का, याबाबत समाजात शंका आहे. कुणबी नोंदी नसलेल्या लोकांच्या लाभासाठी हैदराबाद, सातार...

हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा

Image
हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा प्रतिनिधी - मंजिरी परब साबळे  मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध विचारधारांच्या संघटना एकवटल्या असून, या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि एक भव्य जाहीर सभा घेण्यात आली. मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणतज्ज्ञ, भाषाभ्यासक, राजकीय नेते आणि मराठीप्रेमी जनतेच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. ही जाहीर सभा रविवार, २९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघ, बाळशास्त्री जांभेकर मार्ग,मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर, सीएसएमटी स्थानकाजवळ, मुंबई येथे घेण्यात आली. इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या या निर्णयाविरोधात एकत्र येत, आयोजकांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे – “सरकार मागे हटणार नाही, आपणच पुढे होऊ या!” या घोषवाक्याखाली हा लढा उभारण्यात आला.  सभेदरम्यान जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यं...

Transformations 2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेला नवी मुंबईत सुरुवात

Image
Transformations 2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेला नवी मुंबईत सुरुवात डी.वाय. पाटील विद्यापीठ आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा संयुक्त उपक्रम नवी मुंबई – आर्किटेक्चर, डिझाइन आणि शहरीकरण क्षेत्रातील बदलत्या आणि क्रांतिकारी तंत्रज्ञानावर आधारित *‘Transformations 2025’* या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 26 ते 28 जून 2025 दरम्यान *डी.वाय. पाटील विद्यापीठ*, नवी मुंबई येथे करण्यात आले . ही परिषद *कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर* आणि *डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली असून, आर्किटेक्चर क्षेत्रातील संशोधन, डिजिटायझेशन, शाश्वत शहरी विकास आणि नवकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली.  या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू *डॉ. विजय पाटील*, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष *प्रा. पुरोहित*, कौन्सिलच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका *जयश्री देशपांडे*, तसेच कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या *डायरेक्टर अपर्णा सुर्वे* *आर के ओबेरॉय रजिस्टर कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर आदी मान्यवर उपस्थित होते. या तीन दिवसीय परिषदेमध्ये देशविदेशातील आर्किटेक्ट्स, अभ्यासक, शैक्षणिक तज्ज्ञ यांनी विद...

आरपीआय (आठवले) पक्षा तर्फे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Image
आरपीआय (आठवले) पक्षा तर्फे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी मुंबई (प्रतिनिधी) – बहुजन समाजासाठी अपार कार्य करणारे आणि सामाजिक समतेचे प्रणेते **राजर्षी छत्रपती शाहू महाराज** यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या **केंद्रीय कार्यालय, आझाद मैदान** येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन **आरपीआय (आठवले)पक्ष** आणि **म्युनिसिपल मजदूर संघ** यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात **कामगार नेते प्रकाश जाधव** आणि **आरपीआय पर्यावरण विभागाचे विजय शेट्टी** यांच्या हस्ते **शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून** अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आरपीआय दक्षिण मुंबईचे सरचिटणीस शिरीषभाई चिखलकर यांनी केले. या प्रसंगी विजय जाधव, केंद्रीय कार्यालय सचिव दादासाहेब जाधव, दीपक वाघमारे, नरेंद्र मोहिते,सलीम खतीब, विशाल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना *मिठाईचे वितरण* करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात **शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव** करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक क...

सुस्मित भालेराव विवाहबद्ध

Image
आमच्या वार्ताहराकडून  पारनेर,दि.20 जून, महिना अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुक्यात अनेक विवाह सोहळे थाटामाटात संपन्न झाले.त्यात भाळवणी येथे शिवशक्ती मंगल कार्यालयात अलिकडेच पार पडलेला चि.सुस्मित आणि चि.सौ.का.सुषमा यांचा विवाह सोहळा तालुक्यात अतिशय लक्षवेधी ठरला.        चि.सुस्मित हे आळेफाटा येथील सूर्या रोलिंग शटर्स अ‍ॅण्ड फॅब्रिकेशनचे मालक मधुकरराव निवृत्ती भालेराव व सौ.सुनिता भालेराव यांचे चिरंजीव तर चि.सौ.का.सुषमा या कळस येथील कै.सुभाष दत्तात्रेय क्षीरसागर व श्रीमती राधिकाताई सुभाष क्षीरसागर यांची कन्या आहेत. सुस्मित-सुषमा या उच्च शिक्षित दांपत्याकडून चांगली समाजसेवा घडो.त्यांना जीवनवाटचालीत चांगले यश प्राप्त होत जावो अशा शुभेच्छा जागतिक आरोग्य संघटनेने गौरविलेले प्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ डाॅ.सदानंद राऊत यांनी या नवदांपत्यास दिल्या. या सोहळ्यास डाॅ.बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर, बन्सीशेठ वाकचौरे,किसनराव जाधव, सुतार लोहार संघाचे उपाध्यक्ष उध्दवराव जाधव,रोटरी क्लब आळेफाटाचे माजी अध्यक्ष मोहन जाधव,आकाश ट्रेडर्स...