सुस्मित भालेराव विवाहबद्ध
आमच्या वार्ताहराकडून
पारनेर,दि.20 जून,
महिना अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुक्यात अनेक विवाह सोहळे थाटामाटात संपन्न झाले.त्यात भाळवणी येथे शिवशक्ती मंगल कार्यालयात अलिकडेच पार पडलेला चि.सुस्मित आणि चि.सौ.का.सुषमा यांचा विवाह सोहळा तालुक्यात अतिशय लक्षवेधी ठरला.
चि.सुस्मित हे आळेफाटा येथील सूर्या रोलिंग शटर्स अॅण्ड फॅब्रिकेशनचे मालक मधुकरराव निवृत्ती भालेराव व सौ.सुनिता भालेराव यांचे चिरंजीव तर चि.सौ.का.सुषमा या कळस येथील कै.सुभाष दत्तात्रेय क्षीरसागर व श्रीमती राधिकाताई सुभाष क्षीरसागर यांची कन्या आहेत. सुस्मित-सुषमा या उच्च शिक्षित दांपत्याकडून चांगली समाजसेवा घडो.त्यांना जीवनवाटचालीत चांगले यश प्राप्त होत जावो अशा शुभेच्छा जागतिक आरोग्य संघटनेने गौरविलेले प्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ डाॅ.सदानंद राऊत यांनी या नवदांपत्यास दिल्या. या सोहळ्यास डाॅ.बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर, बन्सीशेठ वाकचौरे,किसनराव जाधव, सुतार लोहार संघाचे उपाध्यक्ष उध्दवराव जाधव,रोटरी क्लब आळेफाटाचे माजी अध्यक्ष मोहन जाधव,आकाश ट्रेडर्सचे शशिकांत जाधव,विठ्ठल जाधव,माजी ग्रामसेवक उत्तमराव वाकचौरे, आयटी इंजिनियर विजय दहिटे,कृषी भूषण मुरलीधर गुंजाळ, माजी उपसरपंच संग्राम फुलवडे, अरुण शेठ गुंजाळ, सुनील शेठ गुंजाळ,व्हाईस चेअरमन ज्ञानदेव घाडगे, रामदास गुंजाळ, यशवंत गुंजाळ, उद्योजक शिरपत घाडगे, रामदास घाडगे,सुनील गुंजाळ, कृ.उ. बा.समितीचे संचालक नबाजी शेठ घाडगे, दिलीप घाडगे, विश्वकर्मा पतपेढीचे विलास डावखर, बाळासाहेब गुंजाळ, नंदू गुंजाळ, बबन शेठ घाडगे, पीडीसीचे व्यवस्थापक मच्छिंद्र घाडगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments