Transformations 2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेला नवी मुंबईत सुरुवात

Transformations 2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेला नवी मुंबईत सुरुवात


डी.वाय. पाटील विद्यापीठ आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा संयुक्त उपक्रम

नवी मुंबई – आर्किटेक्चर, डिझाइन आणि शहरीकरण क्षेत्रातील बदलत्या आणि क्रांतिकारी तंत्रज्ञानावर आधारित *‘Transformations 2025’* या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 26 ते 28 जून 2025 दरम्यान *डी.वाय. पाटील विद्यापीठ*, नवी मुंबई येथे करण्यात आले .

ही परिषद *कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर* आणि *डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली असून, आर्किटेक्चर क्षेत्रातील संशोधन, डिजिटायझेशन, शाश्वत शहरी विकास आणि नवकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली. 


या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू *डॉ. विजय पाटील*, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष *प्रा. पुरोहित*, कौन्सिलच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका *जयश्री देशपांडे*, तसेच कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या *डायरेक्टर अपर्णा सुर्वे* *आर के ओबेरॉय रजिस्टर कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर आदी मान्यवर उपस्थित होते.

या तीन दिवसीय परिषदेमध्ये देशविदेशातील आर्किटेक्ट्स, अभ्यासक, शैक्षणिक तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे नव्या तंत्रज्ञानाची ओळख, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट सिटीज आणि ग्रीन डिझाइनसारख्या मुद्द्यांवर मोलाची माहिती व मार्गदर्शन केले.

परिषदेचे उद्दिष्ट ‘Designing the Future with Disruptive Technologies’ हे असून, पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून भारतातील शहरी नियोजनाचे नवस्वरूप उभे करणे हा तिचा मुख्य हेतू आहे.

परिषदेमुळे आर्किटेक्चर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना जागतिक दर्जाच्या नवकल्पनांचा अनुभव घेता येणार असून, ही परिषद एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यासपीठ ठरत आहे.







Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी