Posts

Showing posts from June, 2026

AICC अल्पसंख्यांक विभागात डॉ. प्रशांत इंगळे यांची राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती

Image
**मुंबई, २ जून :** सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि बौद्ध समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) अल्पसंख्यांक विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील बौद्ध समाज आणि जगभरातील बौद्ध अभ्यासक यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत या नियुक्तीची अधिकृत माहिती देण्यात आली. या वेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिल्लीतील इंदिरा भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या AICC अल्पसंख्यांक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशभरातील विविध समाजघटकांशी संवाद वाढवणे, संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींना बळ देणे या उद्देशाने विभागाच्या कार्याचा विस्तार करण्यात येत असून त्याअंतर्गत डॉ. इंगळे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. इंग...