Posts

Showing posts from March, 2024

*"जय शिवसंग्राम संघटनेची मुंबई - ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळा "*

Image
      ठाणे : लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचा वैचारिक व सामाजिक विचारांचा वारसा चालवत त्यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई -ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठाणे येथे संपन्न झाले. लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी रायगडावर "जय शिवसंग्राम " या संघटनेची स्थापना केली आज ती संघटना महाराष्ट्र मध्ये झपाट्याने वाढत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई - ठाणे येथे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यमान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे यामध्ये कोणी कोणाचा पक्ष पळवला तर कोणी कोणाची संघटना ! आज महाराष्ट्रातील राजकीय घराणे पाहिले असता येथील सर्वच वातावरण गढूळ झालेले आहे .स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भावाचा किंवा चुलत्याचा पक्ष पळवण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व सिद्ध करणे केव्हाही चांगलेच ... यासाठी संघर्ष करावा लागत...

आदर्श सामाजिक संस्था व संत रविदास महाराज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संत रविदास जयंती साजरी !

Image
  कल्याण - रविदास महाराज ह्यांच्या ६४७ व्या स्वर्ण जयंतीच्या निमित्ताने कल्याण पूर्व मधील प्रल्लाद भोईर ह्यांच्या जितेंद्रवाडी पिसवली चाळीतील समस्त रहिवासी ह्याच्या वतीने शनिवार दि. २४/०२/२०२४ रोजी सायं. ५ ते रात्रौ १० पर्यरंत साजरी करण्यांत आली. रविदासांच्या जीवनावरील आधारित संगीतमय गाणी व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कारही मोठ्या उत्साहात होवून संत रविदास महाराज ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ह्या प्रसंगी समाजसेवक प्रल्हादशेठ भोईर, रामदुलारे यादव, संगीत बिरहा कार्यक्रमाचे कलाकार सौ. सरोज त्यागी (भोजपूरी बिरहा गायक) श्री कुशनाथ ध्वज, (भोजपूरी बिरहा गायक) गुडडू बोधमी, (संगायक) इत्यादी मान्यवर व नागरिक आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.