हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा
हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा
प्रतिनिधी - मंजिरी परब साबळे
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध विचारधारांच्या संघटना एकवटल्या असून, या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि एक भव्य जाहीर सभा घेण्यात आली.
मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणतज्ज्ञ, भाषाभ्यासक, राजकीय नेते आणि मराठीप्रेमी जनतेच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.
ही जाहीर सभा रविवार, २९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघ, बाळशास्त्री जांभेकर मार्ग,मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर, सीएसएमटी स्थानकाजवळ, मुंबई येथे घेण्यात आली.
इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या या निर्णयाविरोधात एकत्र येत, आयोजकांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे – “सरकार मागे हटणार नाही, आपणच पुढे होऊ या!” या घोषवाक्याखाली हा लढा उभारण्यात आला.
सभेदरम्यान जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा मागे हटणार नाही असा सज्जड इशारा देण्यात आला.तसेच मुलांवर सर्वांगीण विकार होण्यासाठी पहिल्या 3 वर्षात मातृभाषा नंतर दुसरी भाषा आणि त्यानंतर हवी तर तिसरी भाषा सक्ती करावी असेही विचार मांडण्यात आले.
मुळातच साम्य उच्चार असलेल्या दोन भाषा एकत्र शिकविल्याने एकही भाषा मुलांना शिकता येत नाही.आणि शिकविण्यास मुलांच्या भाषेच्या उच्चारण मध्ये सरमिसळ होऊ शकते असेही भाकित स्पष्ट केले.
महाराष्ट्राला हिंदीभाषिक बनवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ही सभे दरम्या करण्यात आला.

Comments