एसएनडीटी महिला विद्यापीठाला NAAC कडून A+ मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त
मुंबई, जून 2025:
एसएनडीटी महिला विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) कडून प्रतिष्ठेचे A+ श्रेणी मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त झाले आहे, याची विद्यापीठास अभिमानपूर्वक घोषणा करत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, समावेशक शिक्षणपद्धती व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या गतिमान नेतृत्वाखाली विद्यापीठाने अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सातत्याने प्रगती साधली आहे.
या यशामागे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, अंतर्गत गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (IQAC) आणि हितधारकांचे अथक परिश्रम व संघभावना आहे. विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीत खालील प्रमुख अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे:
कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वात प्र-कुलगुरू प्रा. रूबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, IQAC संचालक प्रा. प्रज्ञा वाकपैंजण तसेच, सर्व अधिष्ठाते, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा व मूल्यांकन संचालक, संचालकगण आणि प्रशासनातील सर्व घटकांनी यासाठी मेहनत घेतली आहे.
या प्रेरणादायी टप्प्यामुळे एसएनडीटी महिला विद्यापीठ गुणवत्ता, ज्ञान आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात अधिक जोमाने पुढे वाटचाल करणार आहे.


Comments