Posts

Showing posts from July, 2025

रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Image
रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी  - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  प्रतिनिधी - मंजिरी साबळे  मुंबई दि.21-  भारतीय दलित पँथर पासुन आंबेडकरी चळवळीत काम करणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ; रिपब्लिकन पक्षाचे छत्तीसगढ राज्य सरचिटणीस राजू गोडबोले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.दिवंगत राजु गोडबोले हे छत्तीसगढ मधील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.त्यांना छत्तीसगढ मधील सामाजिक शैक्षणिक आणि बौध्द धम्म चळवळी बरोबरच रिपब्लिकन चळवळ वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे.माझ्या नेतृत्वात त्यांनी भारतीय दलित पँथर पासुन एकनिष्ठपणे रिपब्लिकन पक्षाचे काम केले आहे.राजु गोडबोले यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षासोबत सबंध छत्तीसगढ मधील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.असे सांगत  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवगंत राजु गोडबोले यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. छत्तीसगढच्या भिलाई येथील सियान सदन येथे रिपब्लिकन पक्षा तर्फे  दिवंगत राजु  गोडबोले यांची ...

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती

Image
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती प्रतिनिधी - मंजिरी साबळे    मुंबई दि.21- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई प्रदेशच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांच्या हस्ते सौ.प्रितमाला साळवी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव ;महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा खान आदि मान्यवर उपस्थित होते.                                        रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी मंत्री दिवंगत प्रितमकुमार शेगावकर यांच्या त्या सुकन्या आहेत.रिपब्लिकन चळवळीचे बाळकडु त्यांना लहान पणापासुन लाभले आहे.रिपब्लिकन चळवळीचा वारसा त्यांना घरातुनच लाभला आहे.त्यामुळे प्रितमाला पुलकेशी साळवी य...

मुंबई प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस मुंबई ( के के सी) मेळावा.

Image
मुंबई प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस मुंबई ( के के सी) मेळावा.  _____________ असंघटित कामगारांना त्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने व ताकदि ने संघर्ष करण्याचे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी केले .मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली फेरीवाले, घरेलू कामगार, छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, तसेच ओला, उबेर, झोमॅटो, ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कामगार यांच्या मागण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. कामगार कायद्याचे उल्लंघन केले जाते, न्याय मागणाऱ्या कामगारांना राज्य सरकार न्याय देत नाही, नुसते खोटे आश्वासन देत आहे.  त्यांनी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामगारांनी काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के के सी च्या अध्यक्षा श्रीमती. नीता महाडिक होत्या. त्यांनी मुंबई महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या कामा हॉस्पिटल मधील कंत्राटी कामगारांची व्यथा मांडली. येथील कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन देण्यात आले नाहीत, त्यांचा प्रॉ...