Posts

Showing posts from May, 2026

*इंदोरनंतर आता मुंबईला “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा निर्धार – ‘स्वाहा’ स्टार्टअपची मोठी पहल*

Image
  *इंदोरनंतर आता मुंबईला “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा निर्धार – ‘स्वाहा’ स्टार्टअपची मोठी पहल* **मंजिरी साबळे** मुंबईतील Bahá'í Centre येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ‘स्वाहा’ या स्टार्टअपच्या माध्यमातून झिरो वेस्ट मॅनेजमेंटची नवी संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व समीर शर्मा यांनी केले असून, बहाई धर्माच्या अनुयायांना सोबत घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना समीर शर्मा यांनी सांगितले की, इंदोर शहराला देशातील नंबर वन झिरो वेस्ट मॅनेजमेंट सिटी बनविण्यात यश मिळाल्यानंतर आता मुंबईलाही देशातील सर्वात स्वच्छ आणि “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. मुंबईतील वाढता घनकचरा आणि ओला कचरा ही मोठी समस्या असून, त्यावर शाश्वत उपाय म्हणून ‘स्वाहा’ स्टार्टअपने प्रभावी झिरो वेस्ट मॅनेजमेंट मॉडेल पुढे आणले आहे. या प्रक्रियेद्वारे ओला आणि घनकचरा पूर्णपणे नष्ट करून त्याचे पुनर्वापरक्षम व्यवस्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ग्रीन मुंबई” हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी स...