रिपब्लिकन पक्ष खोरिपा चे मुंबई अध्यक्ष भागवत (अण्णा) कांबळे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा
रिपब्लिकन पक्ष खोरिपा चे मुंबई अध्यक्ष भागवत (अण्णा) कांबळे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा
मुंबई : रिपब्लिकन पक्ष खोरिपा (खोरिपा) चे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत (अण्णा) कांबळे यांचा ५० वा वाढदिवस खोरिपा यांच्या केंद्रीय कार्यालयात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भाऊ निर्भवणे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत अशोक पाटील , मुंबई प्रदेश संघटक सचिव प्रकाश भास्कर केदारे, सायन कोळीवाडा तालुका अध्यक्ष राजेंद्र मांजलकर, तसेच वॉर्ड अध्यक्ष गणेश साठे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खालील फेसबुक लिंक वर क्लिक करा 👇👇👇
https://www.facebook.com/share/v/15EEvKwfMF/
कार्यक्रमाची सुरुवात केक कापून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी भागवत (अण्णा) कांबळे यांचा सत्कार करत त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची प्रशंसा केली.
यानंतर भावूक होत अण्णा यांनी उपस्थितांना संबोधित करत आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावर मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सामाजिक समतेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा वाढदिवस सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.




Comments