देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींसाठी गुरव समाज आक्रमक, ७/१२ दुरुस्ती, जमीन हक्क आणि पुजाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा ऐरणीवर



 निर्माली शर्मा, मुंबई 

अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनी, मंदिर व्यवस्थापन आणि गुरव म्हणजेच पुजारी समाजाच्या हक्कांबाबत गंभीर मुद्दे मांडण्यात आले.

संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले की, राज्यातील अनेक ठिकाणी देवस्थान इनाम जमिनींबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, गुरव समाजाच्या पारंपरिक हक्कांवर गदा आली आहे. या जमिनींची नोंद इतरांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करत, त्या जमिनी पुन्हा मूळ हक्कधारक गुरव समाजाकडे देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

तसेच ७/१२ उताऱ्यांमध्ये झालेल्या चुकीच्या नोंदी तात्काळ दुरुस्त करून, पूर्वीप्रमाणेच गुरव समाजाची नावे नोंदवावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. इनाम वर्ग-३ जमिनींवरील अटी-शर्ती रद्द करून त्या कायमस्वरूपी हक्काने देण्यात याव्यात, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  स्पष्ट केले.

मंदिर व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर बोलताना, ट्रस्टमध्ये गुरव (पुजारी) यांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्यात यावे, तसेच मंदिरात सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांना किमान वेतन आणि आर्थिक सुरक्षा मिळावी, अशी ठाम भूमिका शितल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी संघटनेच्या वतीने मांडली.

याशिवाय शासनाने मंदिर ताब्यात घेण्याऐवजी त्यांचा विकास करून ती स्वयंपूर्ण करावीत, तसेच गुरव समाजाच्या संरक्षणासाठी कठोर कायदे लागू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

संघटनेने इशारा देत म्हटले आहे की, जर या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.



Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी