Posts

२१ वर्षे, न्याय नाही: डॉ. आशा गोयल यांच्या कुटुंबाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची केली विनंती

Image
डीएनए पुरावे आणि कबुलीजबाब असूनही, कायदेशीर विलंबामुळे दुखावलेल्या कुटुंबाला अद्याप दिलासा नाही मुंबई: डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी आज मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. नामांकित प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. आशा गोयल यांची मुंबई दौऱ्यावर असताना २२ ऑगस्ट २००३ रोजी मुंबईत निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कन्या रश्मी गोयल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या दीर्घ विलंबाबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.  २१ वर्षांपासून गोयल कुटुंब न्यायासाठी लढत आहे, परंतु डीएनए पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि अगदी कबुलीजबाबासह ठोस पुरावे असूनही हा खटला अद्याप सुटलेला नाही. या विलंबामुळे कुटुंबाला मोठ्या मानसिक यातना सहन कराव्या लागत असून न्याय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. डेन्व्हर विद्यापीठात गुन्हेगारी कायद्याच्या प्राध्यापक असलेल्या रश्मी गोयल यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. "आम्ही खूप वाट पाहिली आहे, आता आमचा संयम सुटला आहे. माझ्या आईने संपूर्ण आयुष्य इतरां...

ठाणे मनपा क्षेत्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना पहिली कार्यकारणी सभा संपन्न

Image
महानगरपालिका क्षेत्रासोबत ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राचा विकास हेच आमचे ध्येय - प्रमोद वाघमोडे ठाणे : ठाणे मनपा क्षेत्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना पहिली कार्यकारणी सभा शनिवार 15 मार्च रोजी ठाणे जिल्हा अथलेटिक संघटनेचे कार्यालय दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे मनपा क्षेत्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रंजीत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये ठाणे मनपा कार्यकारणी तर्फे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण  शिक्षक महासंघावर निवडलेले नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद वाघमोडे तसेच कार्यालयीन सचिव राजेंद्र पवार, संघटक पांडुरंग ठोंबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी येणार्‍या वर्षभरातील महासंघाच्या कार्याची माहिती उपस्थित क्रीडा शिक्षकांना दिली. ठाणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता 8 तालुके व 6 महानगरपालिका असून  शालेय क्रीडा स्पर्धांसाठी, तालुक्यांना ग्रामीण स्पर्धा व महानगरपा...

स्वामी कृपाकिर्त संस्थेच्या वतीने भव्य आध्यात्मिक संमेलनाचे आयोजन

Image
  **शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा १२ मार्चला 'धडक मोर्चा'**   शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी १२ मार्च २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानात 'धडक मोर्चा'चे आयोजन केले आहे.   गोवा ते नागपूर या महामार्गामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थ प्रभावित होणार आहेत. हा महामार्ग शेतकरीविरोधी, पर्यावरण विरोधी आणि जनविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, ८६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोपही या प्रकल्पावर लावण्यात आला आहे.   या आंदोलनात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा देण्यात आला  आहे.

सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठात उत्साहात संपन्न

Image
  सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठात उत्साहात संपन्न मुंबई, (१०_३_२०२५) – महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना गौरवण्यासाठी आयोजित सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. त्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. श्री. वेणुगोपाल रेड्डी यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत, ग्रामीण भागातील विकासात त्यांच्या कार्यामुळे महत्त्वाचा बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सन्माननीय कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या भाषणात पुरस्कार निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिली आणि सर्व पुरस्कारप्राप्त महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात सहा महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांवरही या वेळी चर्चा करण्यात आल...

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे 'Invictus' कार्यक्रमाचा शुभारंभ – JEE तयारीसाठी गेम-चेंजर उपक्रम

Image
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे 'Invictus' कार्यक्रमाचा शुभारंभ – JEE तयारीसाठी गेम-चेंजर उपक्रम पुणे, १० मार्च: भारतातील प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या **आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL)** तर्फे IIT आणि अन्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मार्गदर्शन मिळावे यासाठी **'Invictus'** नावाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.   या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश JEE परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार आणि प्रभावी शिक्षण देणे हा आहे. AI-आधारित तंत्रज्ञान, वैयक्तिक शिकवणी प्रणाली आणि अत्याधुनिक अभ्यास पद्धतींचा या उपक्रमात समावेश आहे.   ### **कार्यक्रमाच्या प्रमुख वैशिष्ट्ये:**   - **JEE परीक्षेतील तज्ज्ञ शिक्षकांची टीम:** भारतभर ३०+ शहरांतील ५०० हून अधिक तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.   - **AI-आधारित वैयक्तिक प्रशिक्षण:** विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सानुकूलित शिक्षण पद्धती.   - **अत्याधुनिक अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण मूल्यांकन:** २४x७ डिजिटल स्टडी मटेरियल ...

लग्नाचे आमिष दाखवून सेवानिवृत्त महिलेची फसवणूक

Image
  लग्नाचे आमिष दाखवून सेवानिवृत्त महिलेची फसवणूक मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून, लाखो रुपये घेवून, जीवे मारणे धमकी, अश्लील व्हिडीओ दाखवणे धमकी, एफआयआर दाखल, तेरा तास पिडीतेस बसवून रात्री ११ वाजता अखेर मामा पांढरे राजिनामा काळे यांचा निलंबन या सर्व विषया धरून पीडित महिलेने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली  सुमीत चंद्रकांत काळे व सुर्यकांत सुकदेव पांढरे दोन्ही मिळून स्त्रीयांची (विधवा, सेवानिवृत्त, घटस्फोटीत, गरजू) फसवणूक करतात. सुमित काळे यांनी पिडीतेस लग्नाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडीओ पाठवून प्रेमाचे ऑडिओ पाठवून अडीच लाख घेतले नंतर लग्न करणार यासाठी ५ लाख मामा पांढरे यांच्या घरी पिंडीतीने नेऊन दिले. तीन लाख, १) लाख लाख व महिना १) ल १० ते १२ हजार व अडी अडचणील १ ते २ हजार असे पैसे घेतले. नोकरीसाठी रेल्वे, न्यु हिंदी हायस्कुल, शिवाजी हायस्कुल, यासाठी अनेक वेळा पैसे घेतले. ७० हॉटेलस मध्ये सोबत फिरले. सर्व पैसे पिडीतेकडून घेऊन मजा केली व नोकरी लागली तर पैसे परत करणार असे सांगून वारंवार पैसे घेत होते. मामा पांढरे आश्वासन देत होते की, काळे आणि पिडीतीचे लग्न करुन देणार प...

पँथर आर्मीचे मुंबई आझाद मैदानात बेमुदत उपोषण

Image
    कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनिची कमाल मर्यादा अट रद्द करा या व विविध मागण्यासाठी आंदोल मुंबई : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनिची कमाल मर्यादा अट रद्द करा व या अन्य  मागणी करिता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे आझाद मैदान मुंबई येथे  बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलनास आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली . अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमीहिन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायत करिता आठ लाख रुपये व जिरायत करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या प्रमुख मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष  संतोष एस आठवले, राष्ट्रीय नेते डॉ . राजेंद्रसिंग वालिया , महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसंडेकर , राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे , महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा ज्योतीताई झरे...