स्वामी कृपाकिर्त संस्थेच्या वतीने भव्य आध्यात्मिक संमेलनाचे आयोजन
**शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा १२ मार्चला 'धडक मोर्चा'**
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी १२ मार्च २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानात 'धडक मोर्चा'चे आयोजन केले आहे.
गोवा ते नागपूर या महामार्गामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थ प्रभावित होणार आहेत. हा महामार्ग शेतकरीविरोधी, पर्यावरण विरोधी आणि जनविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, ८६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोपही या प्रकल्पावर लावण्यात आला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Comments