*"जय शिवसंग्राम संघटनेची मुंबई - ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळा "*
ठाणे : लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचा वैचारिक व सामाजिक विचारांचा वारसा चालवत त्यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई -ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठाणे येथे संपन्न झाले.
लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी रायगडावर "जय शिवसंग्राम " या संघटनेची स्थापना केली आज ती संघटना महाराष्ट्र मध्ये झपाट्याने वाढत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई - ठाणे येथे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यमान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे यामध्ये कोणी कोणाचा पक्ष पळवला तर कोणी कोणाची संघटना ! आज महाराष्ट्रातील राजकीय घराणे पाहिले असता येथील सर्वच वातावरण गढूळ झालेले आहे .स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भावाचा किंवा चुलत्याचा पक्ष पळवण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व सिद्ध करणे केव्हाही चांगलेच ... यासाठी संघर्ष करावा लागतो ,किंबहुना रस्त्यावर उतरावे लागते .रस्त्यावर उतरून गोरगरीब - वंचित - उपेक्षितांची लढाई लढावी लागते .छोटसं का होईना स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची धमक फक्त काही लोकांतच असते ... यामध्ये बीडचा विचार केला असता रामहरी मेटे यांना मानावेच लागेल . बंधूच्या अपघाती मृत्यूनंतर पारिवारिक आरोप - प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा किंवा भावाची संघटना पळवली या संदर्भात इतरांनी आपल्याकडे बोट दाखवणे हे मला सहन झाले नसते .आपण स्वाभिमानान जगलं पाहिजे .म्हणून भावाची संघटना माझी आहे हे सिद्ध करण्यासाठीवाद -विवाद करण्यापेक्षा स्व : कष्टान - स्वतःच अस्तित्व निर्माण करून " जय शिवसंग्राम " संघटनाचे छोटासे रोपटे लावले काही काळानंतर नक्कीच वटवृक्षात रुपांतर होईल . तसेच याच दिशेने न खचता पाऊल टाकले या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुकच होत आहे . ही संघटना जोमाने कामाला लागली असून अनेक नागरिक पदाधिकारी लोक पाठिंबा देत आहेत तसेच प्रत्यक्ष प्रवेश करत आहेत याचाच एक भाग म्हणून आज मुंबई -ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठाणे येथे करण्यात आले
*जय शिवसंग्राम* संघटना पुढील हेतू आणि उद्दिष्ट समोर ठेवून काम करत आहे . १ .मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकाऊ आरक्षण मिळेपर्यंत आरक्षणाचा लढा चालू ठेवणे . २ .अरबी समुद्रामध्ये श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठीचा लढा चालू ठेवणे . ३ .विद्यार्थ्यास बेकारी भत्ता मिळवून देण्यासाठी जय शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून लढा उभा करणे . ४ . शेतकऱ्यास पेन्शन योजना लागू करण्यासाठी शेतकरी आघाडीच्या माध्यमातून जय शिवसंग्राम संघटनेचे काम चालू केले आहे ५ .सामान्य नागरिकास त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठीजय शिवसंग्राम संघटनेचा लढा देईल ६ .अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाज प्रबोधनपर कार्य करेल . ७ .महिला व्यक्तिमत्व विकासासाठी योगदान देणे . ८ . विशेष आव्हानात्मक बालकासाठी योगदान देणे .९ .राज्य व केंद्र सरकारच्या समाज उपयोगी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास मदत करणे .१० . सामाजिक -सांस्कृतिक व धार्मिक मूलतत्त्वे जोपासणे . ११ .वंचित - उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी योगदान देणे . उपर्यक्त उद्दिष्टा सहित वंचित उपेक्षितांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी स्व.लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या सामाजिक तत्त्वानुसार ही संघटना स्थापन करण्यात आली व भविष्यात ही काम करेल यात तिळमात्र शंका नाही आजच्या या बैठक मेळाव्यामध्ये पुढील प्रवेश झाले...
संजय मधुकर वरेकर लक्ष्मीकांत गायकवाड राहुल लाखे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह रामहरी भैया मेटे दीपक कदम आकाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जय शिवसंग्राम मध्ये प्रवेश केला तसेच मुंबई ठाणे मधील नियुक्त जाहीर करण्यात आल्या नियुक्ती खालील प्रमाणे आहेत श्री विजय चंद्रकांत राणे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अमोल हरिचंद्र गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष राहुल नामदेव लाखे नवी मुंबई शहराध्यक्ष श्री लक्ष्मीकांत गायकवाड श्री संजय मधुकर वरेकर ट्रॉम्बे मानखुर्द तालुका अध्यक्ष राकेश व्यंकटेश बोजगार अंधेरी पूर्व वार्ड 86 अध्यक्ष सौ स्वाती संकेत कदम ठाणे महिला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या बैठकीस उपस्थित रामहरी मेटे दीपक कदम आकाश जाधव यांच्यासह संतोष पवार बळीराम पडोळे सुनील कुटे विनोद वरेकर संतोष गायकवाड मुंजाभाऊ खंडागळे प्रवीण गायकवाड अजय पाटोळे अमोल गायकवाड इनुस पठाण भरत बिराजदार अक्षय भगत तुकाराम पाटोळे माऊली दुपाटे शंकर माळी श्याम मगर ज्ञानेश्वर सुरवशे बबलू गवळी आधी बैठकीस उपस्थित होते आभार प्रदर्शन ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय राणे यांनी मानले..

Comments