आदर्श सामाजिक संस्था व संत रविदास महाराज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संत रविदास जयंती साजरी !

 


कल्याण -

रविदास महाराज ह्यांच्या ६४७ व्या स्वर्ण जयंतीच्या निमित्ताने कल्याण पूर्व मधील प्रल्लाद भोईर ह्यांच्या जितेंद्रवाडी पिसवली चाळीतील समस्त रहिवासी ह्याच्या वतीने शनिवार दि. २४/०२/२०२४ रोजी सायं. ५ ते रात्रौ १० पर्यरंत साजरी करण्यांत आली.

रविदासांच्या जीवनावरील आधारित संगीतमय गाणी व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कारही मोठ्या उत्साहात होवून संत रविदास महाराज ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


ह्या प्रसंगी समाजसेवक प्रल्हादशेठ भोईर, रामदुलारे यादव, संगीत बिरहा कार्यक्रमाचे कलाकार सौ. सरोज त्यागी (भोजपूरी बिरहा गायक) श्री कुशनाथ ध्वज, (भोजपूरी बिरहा गायक) गुडडू बोधमी, (संगायक) इत्यादी मान्यवर व नागरिक आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

लातूरच्या महामार्गाची दुरवस्था; अपघातांत जनतेचे बळी, सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आझाद मैदानात एकदिवासीय धरणे आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी