*इंदोरनंतर आता मुंबईला “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा निर्धार – ‘स्वाहा’ स्टार्टअपची मोठी पहल*
*इंदोरनंतर आता मुंबईला “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा निर्धार – ‘स्वाहा’ स्टार्टअपची मोठी पहल*
**मंजिरी साबळे**
मुंबईतील Bahá'í Centre येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ‘स्वाहा’ या स्टार्टअपच्या माध्यमातून झिरो वेस्ट मॅनेजमेंटची नवी संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व समीर शर्मा यांनी केले असून, बहाई धर्माच्या अनुयायांना सोबत घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना समीर शर्मा यांनी सांगितले की, इंदोर शहराला देशातील नंबर वन झिरो वेस्ट मॅनेजमेंट सिटी बनविण्यात यश मिळाल्यानंतर आता मुंबईलाही देशातील सर्वात स्वच्छ आणि “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. मुंबईतील वाढता घनकचरा आणि ओला कचरा ही मोठी समस्या असून, त्यावर शाश्वत उपाय म्हणून ‘स्वाहा’ स्टार्टअपने प्रभावी झिरो वेस्ट मॅनेजमेंट मॉडेल पुढे आणले आहे.
या प्रक्रियेद्वारे ओला आणि घनकचरा पूर्णपणे नष्ट करून त्याचे पुनर्वापरक्षम व्यवस्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ग्रीन मुंबई” हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बहाई समुदायाच्या शिकवणीतून मानवता, एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत युवकांना सकारात्मक दिशादर्शन करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे. तसेच पर्यावरणाच्या वाढत्या समस्या, कचऱ्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके, नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आणि तरुणांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळेस बाही समुदायाचे नर्गिस गौर व चंद्रकांत बुटले उपस्थित होते
‘स्वाहा’ ही केवळ स्टार्टअप नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. मुंबई अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिमा, कार्यशाळा आणि जनजागृती उपक्रम राबविले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


Comments