दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप

    दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप 

मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कर्जत येथे शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे तत्कालीन पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. नोव्हेंबर २०१३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स करप्शन ही भ्रष्टाचारा विरोधात मोहीम देशभरात राबवली होती. सदर मोहिमेनंतर अण्णा हजारे प्रसिद्ध झाले व त्यांच्या नावावर मिळणारा फंड अंजली दमानिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी हडप केल्यावर

स्वतः कर्जत येथे कमी भावात शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतल्या. सदर जमिनी खरेदीची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितीन चव्हाण यांनी केली आहे.



Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

लातूरच्या महामार्गाची दुरवस्था; अपघातांत जनतेचे बळी, सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आझाद मैदानात एकदिवासीय धरणे आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी